Tuesday, March 14, 2017

Smile, breathe and go slowly.

अमेरिकेत नुकताच खरेदीचा विस्फ़ोट होणा-या ब्लॅक फ़्रायडे मेगा डिस्काऊंट सेलच्या विरोधात नो शॉपिंग चळवळीचा झालेला बोलबाला, तिथेही आता मोठ्या प्रमाणावर कोक पिऊ नका, शहाळ्याचं पाणी प्या असा किंवा मॉयश्चरायझर किंवा महागडी नाईट क्रिम लाऊ नका, त्यापेक्षा खोबरेल तेल चांगले, नैसर्गिक साधने, वनस्पतींचा वापर करा असा सुरु झालेला प्रचार.. कोणी निसर्गाकडे परत म्हणतात, कोणी मिनिमलिस्ट लाइफ़ स्टाईल, कोणी स्मॉल इज लेस किंवा रिच लाइफ़ विथ लेस स्टफ़ म्हणतात. ते साधेपणात समृद्धी मानायला लागले आहेत. काही जण आलिशान घरांचा त्याग करुन ५० स्क्वे.फ़ू. घरात रहातात, बॅकपॅक मधे मावेल इतक्याच सामानावर रहातात, काही जण एकही लेबलन वापरण्याचा, किंवा गरजेच्या अत्यावश्यक वस्तू सोडून काहीच खरेदी न करण्याचे ठरवतात, बाय नथिंग डे/इयर साजरा केला जातो. काटेकोर बजेटवर रहाणे, रोज एक डॉलर फ़क्त अशी गुजराण करणं, क्रेडिट कार्डचा वापर बंद केला आहे अनेकांनी. कच-याच्या अतिरेकावर उतारा म्हणून ही कचरा-मुक्त जीवनशैली. फिझिकली आणिं मेंटली सुद्धा. काही कचरा ठेवायचा नाही. देउन टाकायचा, फेकून द्यायचा किंवा त्याचा पुनर्वापर करायचा. आहेत ती साधने गरजेपुरतीच रोजच्या आयुष्यात वापरायची. आपली शक्ती, उर्जा जास्त क्रियाशिल, कृतिशिल आणि सर्जनशिल कामांकरता राखून ठेवायची. 

आयुष्याचा अति वेग काढून टाकायचा हा स्टार्टींग पॉइन्ट. तर त्याची नेमकी सुरुवात कुठून आणि कशा प्रकारे करायची. आता हे सगळं जाणून घेण्याकरता पुन्हा माहितीच्या महाजालातच फ़ेरफ़टका मारायला लागणार तर यापेक्षा वेगळी आयरनी कोणती? पण कदाचित आजूबाजूच्या, तुमच्या आमच्यांच्या अगदी शेजारी हाताच्या अंतरावर असलेल्यांनीही काही उपाय शोधलेच असतील यावर. ज्यांना योग्य समतोल साधता आला ती खरी सुखी लोकं. आपण निदान त्यांनी काय केलं हे जाणून घेऊन चक्रातून पायऊतार होण्याची सुरुवात तरी करु शकतोच.
------------


No comments:

Post a Comment